योगाच्या माध्यमातून स्वतःचे स्वास्थ्य जपा - सचिन साळुंखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:27+5:302021-06-22T04:24:27+5:30
पिंपळनेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना व विद्यार्थी विकास विभाग यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते ...

योगाच्या माध्यमातून स्वतःचे स्वास्थ्य जपा - सचिन साळुंखे
पिंपळनेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना व विद्यार्थी विकास विभाग यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे होते. यावेळी योगशिक्षक प्रा. वाय. एम. नांद्रे, पत्रकार सुभाष जगताप उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधत शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये तृतीय वर्ष पदार्थ विज्ञान शाखेतून संपूर्ण विद्यापीठातून सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली व दोन सुवर्णपदकांची मानकरी ठरलेली वैभवी अनिल शिंपी या विद्यार्थिनीचा सत्कार स.पो.नि. सचिन साळुंके यांच्याहस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रा. डॉ. डब्ल्यू. बी. शिरसाठ लिखित जनरल केमिस्ट्री या संदर्भग्रंथाचे विमोचन देखील साळुंके व प्राचार्य डॉ. एस. टी. सोनव, सुभाष जगताप यांच्याहस्ते करण्यात आले. प्रा. के. डी. कदम यांच्या वॉक फॉर सोसायटी या सामाजिक उपक्रमात देशभरातून सलग तीन वेळा दि्वतीय क्रमांक व यावर्षी प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजय खोडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. सी. एन. घरटे व प्रा. पी. एम. सावळे हे प्रयत्नशील होते.