साक्रीतील डॉक्टर व वसतीगृह कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:30 IST2020-03-13T12:30:13+5:302020-03-13T12:30:50+5:30

धुळे : महिला शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Take action on doctors and hostel staff in Sakri | साक्रीतील डॉक्टर व वसतीगृह कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री शहरातील सावित्रीबाई फुले आदिवासी मुलींच्या वसतीगृहात मुलींच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा करणाºया डॉक्टर व वसतिगृहातील कर्मचाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरांगना झलकारीबाई (कोळी) स्त्री शक्ती सामाजिक संस्था व महिला शक्ती संघटना, साक्री यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
याबाबत संघटनांतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. साक्री शहरात एका मुलीने वसतीगृहात टॉयलेटमध्ये बाळाला जन्म दिला व त्या बाळाला कचराकुंडीत टाकून देण्यात आले. ही घटना अतिशय निंदनीय व संतापजनक असून यामुळे वसतीगृहातील मुलींच्या सुरक्षिता चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे यातील दोषी डॉक्टर व कर्मचाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरांगना झलकारीबाई स्त्री शक्ती सामाजिक संस्थेच्या गितांजली कोळी, महिला शक्ती संघटनेच्या जोशिला पगारिया, संगिता सैंदाणे, सुनित चौधरी, मालती सूर्यवंशी आदींनी केली आहे.

Web Title: Take action on doctors and hostel staff in Sakri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे