गैरकृत्य करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST2021-09-21T04:40:04+5:302021-09-21T04:40:04+5:30
नगांवबारी व दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मागील तीन महिन्यांपासून चुकीची व वाढीव रकमेची बिले पाठविले जात आहेत. अनेक ...

गैरकृत्य करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
नगांवबारी व दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मागील तीन महिन्यांपासून चुकीची व वाढीव रकमेची बिले पाठविले जात आहेत. अनेक ग्राहकांना मीटर रिडिंग दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतर घेऊन एकत्र बिल देण्यात आले आहे. त्यामुळे वीज बिलात प्रचंड चुकीची व बेकायदेशीर वाढ झाली आहे.
शंभर रिडिंगपर्यंत ३.७६ रुपये प्रतियुनिट असताना रिडिंग ३० दिवसानंतर घेतल्याने रिडिंग शंभरच्या वर गेल्यास हा दर दुप्पट म्हणजे ७.२१ रुपये प्रतियुनिट होत आहे. तीनशेच्या वर रिडिंग गेल्यास दर तिप्पट ९.९५ रुपये प्रतियुनिट आहे. ५०० च्या वर रिडिंग गेल्यास चौपट ११.३१ रुपये प्रतियुनिटप्रमाणे दर आकारला जातो. महावितरण कंपनीने ग्राहकांची फसवणूक करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हा महिला संघटक संगीता जोशी देवपूर, संघटका मनीषा शिंपी, नितीन शिरसाट, चंद्रकांत गुरव, उप महानगरप्रमुख ललित माळी, उप महानगरप्रमुख देविदास लोणारी, शाखाप्रमुख सिद्धार्थ बागुल, उपविभाग प्रमुख मोहित वाघ, शाखाप्रमुख रोहित अमृतकर, कविता वाघ, पूजा वाकडे, अनिता सूर्यवंशी आदी उपस्थित होते.