तहसील कार्यालयाचे छत कोसळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 11:44 IST2019-07-11T11:44:11+5:302019-07-11T11:44:40+5:30

शिरपूरची घटना : सुदैवानी जीवितहानी नाही

Tahsil office | तहसील कार्यालयाचे छत कोसळले 

तहसील कार्यालयातील कोसळलेल्या छताचे दृश्य. 

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील तहसिल कार्यालयातील इमारतीचे स्लॅबचे प्लॅस्टर तिसºयांदा पडल्याने कर्मचाºयांमध्ये घबराट निर्माण झाली़ 
१० रोजी तहसिल कार्यालयात कर्मचारी नेहमीप्रमाणे बसले असतांना अचानक स्लॅबचे प्लॅस्टर पडले़ जवळच बसलेल्या शिरसाठ नामक महिला बचावल्यात़ यापूर्वी, देखील याच ठिकाणी अशाप्रकारचे प्लॅस्टर पडले आहे़ 
या संदर्भात महसूल प्रशासनाने वारंवार बांधकाम विभागाला पत्र दिले सुध्दा आहे़ निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे़
घटनेचे वृत्त कळताच प्रांताधिकारी डॉ़विक्रम बांदल व तहसिलदार चंद्रशेखर देशमुख यांनी भेट देवून माहिती जाणून घेतली़ तिसºयांदा अशी घटना घडली असून दुरुस्ती न केल्यास यापुढेही अशी घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: Tahsil office

टॅग्स :Dhuleधुळे