सफाई कामगारांनी सुरक्षेला प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST2021-01-13T05:34:13+5:302021-01-13T05:34:13+5:30

शहरातील आयएमए सभागृहात सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज उपक्रमांतर्गत सोमवारी महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा झाली. यावेळी उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी ...

Sweepers should prioritize safety | सफाई कामगारांनी सुरक्षेला प्राधान्य द्यावे

सफाई कामगारांनी सुरक्षेला प्राधान्य द्यावे

शहरातील आयएमए सभागृहात सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज उपक्रमांतर्गत सोमवारी महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा झाली. यावेळी उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समितीचे सभापती सुनील बैसाणे, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, सहायक आयुक्त विनायक कोते, तुषार नेरकर, नगर सचिव मनोज वाघ, सहायक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील यांच्यासह स्वच्छता निरीक्षक, मुकादम, सफाई कामगार उपस्थित होते. सफाई कामगारांना धोकेदायक ठिकाणीही गटारीची स्वच्छता करावी लागते. तसेच विविध प्रकारचा धोकेदायक कचरा हाताळावा लागतो. त्यामुळे सफाई कामगारांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. सफाई कामगारांना विविध सुरक्षा साधने पुरवण्यात येतात. त्याचा त्यांनी आवश्यक वापर करावा. त्याचप्रमाणे व्यसनापासून लांब राहावे, असे महापौर चंद्रकांत सोनार यांनी सांगितले. यावेळी ट्रेनर राकेश पवार यांनी सफाई मित्र सुरक्षा उपक्रमाची माहिती दिली. सफाईच्या कामात यांत्रिकीकरणाचा वापर वाढवण्याचे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. उपायुक्त शांताराम गोसावी यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Sweepers should prioritize safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.