विवाहितेवर अत्याचार संशयित फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:55 IST2019-11-18T22:54:12+5:302019-11-18T22:55:29+5:30
हडसुणे येथील घटना

विवाहितेवर अत्याचार संशयित फरार
धुळे : विवाहितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना धुळे तालुक्यातील हडसुणे गावात सोमवारी दुपारी घडली़ यानंतर मनस्ताप सहन न झाल्याने पिडीत विवाहितेने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ संशयित फरार झाला आहे़
धुळे तालुक्यातील हडसुणे गावातील भिलाटीत राहणारी महिला दुपारी शेतात शौचास गेली होती़ या ठिकाणी एक तरुण दुचाकी घेऊन आला़ दुचाकी बाजूला लावून त्याने तिला पकडले़ दमदाटी करत असल्याने दोघांमध्ये झटापटही झाली़ त्याने तिच्यावर अत्याचार करत तेथून पसार झाला़ या घटनेमुळे मनस्ताप झालेल्या तिने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी संशयित प्रमोद उर्फ बुट्या नारायण अहिरे (भील) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे़ तो फरार झाल्यामुळे पोलीस शोध घेत आहेत़