धुळे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:27 IST2018-05-17T22:27:33+5:302018-05-17T22:27:33+5:30

एसीबी : नाशिकच्या पथकाची कारवाई

Superintendent of Dhule State Excise Duty | धुळे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक जाळ्यात

धुळे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक जाळ्यात

ठळक मुद्देनाशिकच्या पथकाची धुळ्यात कारवाई४ हजाराची लाचेची मागणी भोवली

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : बियर शॉपीच्या नूतनीकरणासाठी धुळ्यातील कामकाज पूर्ण करून देण्याच्या मागणीसाठी चार हजारांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय अधीक्षक धनराज मून व वरिष्ठ लिपिक रविंद्र अहिरे यांना गुरूवारी दुपारी कार्यालयातच रंगेहाथ पकडण्यात आले़ दरम्यान, नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे़ 
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय अधीक्षक धनराज महादेवराव मून (५८, रा़ मुंदडा नगर, गायत्री प्रोव्हीजन मागे, जळगाव) हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते़ मात्र, तत्पूर्वीच त्यांच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत़ मून यांच्या जळगावातील घराची झडती घेण्यात आली़ तर रविंद्र जगन्नाथ अहिरे (४३, रा़ नवजीवन हौसिंग सोसायटी,नकाणे रोड, देवपूर, धुळे) यांच्या घराचीही पथकाने सायंकाळी उशिरापर्यंत झडती घेतली़ मात्र, त्यात फारसे काही आढळले नसल्याचे सांगण्यात येत आहे़ 
नाशिकचे पथक धुळ्यात
धुळ्यातील ५१ वर्षीय बियर बारच्या चालकाने या संदर्भात नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. अधीक्षक मून यांनी धुळे कार्यालयातील बियर शॉपी नूतनीकरणाचे कामकाज पूर्ण करून देण्यासाठी चार हजार लाचेची मागणी लिपिकाद्वारे केली होती़ तर तक्रारदाराने नाशिकमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर गुरुवारी सापळा रचण्यात आला. दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वत: मून यांना जिजामाता हायस्कूलजवळील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातच लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई नाशिक एसीबीचे निरीक्षक प्रभाकर निकम व सहकाºयांनी केली. धुळ्यातील पथकाने सहकार्य केले़

Web Title: Superintendent of Dhule State Excise Duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.