उन्हाळी भुईमुगाचे एकरी उत्पन्न घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST2021-05-11T04:38:04+5:302021-05-11T04:38:04+5:30
कापडणेसह देवभाणे, सोनगीर, सरवड ,धमाणे, बिलाडी, न्याहाळोद, कौठळ, तामसवाडी मोहाडी, प्र. डांगरी आदी परिसरात भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे. ...

उन्हाळी भुईमुगाचे एकरी उत्पन्न घटले
कापडणेसह देवभाणे, सोनगीर, सरवड ,धमाणे, बिलाडी, न्याहाळोद, कौठळ, तामसवाडी मोहाडी, प्र. डांगरी आदी परिसरात भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे. शेतकरी सध्या उन्हाळी हंगामातील शेतपिकांच्या काढणीच्या तयारीत आहेत, तर काही शेतकऱ्यांचे भुईमुगाचे पीक आठवड्याभरात काढणीवर येणार आहे, मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेने उन्हाळी हंगामातील भुईमुगाच्या उत्पादनात सरासरी सात ते आठ क्विंटल घट आली आहे. तसेच गुरांसाठी कामात येणारा भुईमुगाचा चारा याच्यातदेखील कमालीची घट येत आहे. यामुळे उन्हाळी हंगामातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे भुईमूग पीक हे यंदाच्या हंगामात संपूर्णपणे तोट्यात गेलेले आहे.
भुईमुगाच्या एका झाडाला ३० ते ४० शेंगा लागतात. परंतु यंदा केवळ पाच ते दहा शेंगा लागलेल्या आहेत. झाडांची वाढदेखील पुरेशा प्रमाणात झालेले नाही./ यामुळे भुईमूग शेंगा व भुईमूग पाल्यात कमालीची घट आलेली आहे. भुईमूग शेंगांना केवळ होलसेल बाजार मार्केटमध्ये केवळ चार हजार रुपये क्विंटल दराचा भाव मिळत आहे .उत्पादनातही घट व उत्पादित मालालाही अत्यंत कमी भाव मिळत असल्याने भुईमुगाचे पीक यंदा अत्यंत तोट्यात गेलेले आहे.
गेल्यावर्षी शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमुगाचे पीक विक्रमी झाले होते. एक बिघा शेतात नऊ ते दहा क्विंटल भुईमुगाचे उत्पादन झाले होते. त्या तुलनेने यंदाच्या उन्हाळी हंगामात भुईमूग शेंगांचे पीक केवळ दोन ते तीन क्विंटल झाले असून, भुईमूग शेंगाचा चारादेखील जेमतेम एक बैलगाडी भर शेतकऱ्यांना मिळणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट आलेली आहे. भुईमूग पीक घेण्यासाठी यंदाचे हवामान वातावरण पोषक नसल्यामुळे भुईमूग उत्पादनात मोठी घट आलेली आहे, अशी माहिती येथील आदर्श शेतकरी अरुण परशुराम पाटील यांनी दिली आहे.