धुळ्यात एका तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:14 IST2019-09-14T22:13:38+5:302019-09-14T22:14:04+5:30
भावसार कॉलनीतील घटना : घटनेमागील कारण अस्पष्ट

धुळ्यात एका तरुणाची आत्महत्या
धुळे : शहरातील साक्री रोड येथील गोदाई कॉलनी परिसरात राहणाºया तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़
धिरज वाघ (३२) असे त्या तरुणाचे नाव आहे़ शहरातील साक्री रोडवर गोदाई कॉलनीजवळच असलेल्या भावसार कॉलनीत काही दिवसांपुर्वी तिसºया मजल्यावर भाडेकरु म्हणून राहण्यासाठी आलेला धिरज वाघ (पूर्ण नाव माहित नाही) हा रबरी शिक्के तयार करण्याचे काम करतो़ या तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली़ घटना लक्षात आल्यानंतर शहर पोलिसांना माहिती देण्यात आली़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे़ त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही़ पुढील तपास सुरु आहे़