धुळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 22:03 IST2019-08-26T22:03:21+5:302019-08-26T22:03:57+5:30
धनदाई नगर : आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात

धुळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
धुळे : शहरातील गोंदूर रोडवर असलेल्या धनदाई नगरात गळफास लावून घेत तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्घटना घडली आहे़ पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, त्याने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही़
शहरातील देवपूर भागात असलेल्या धनदाई नगरातील प्लॉट नंबर ६२ मध्ये राहणारे प्रमोद सुकलाल देवरे (३४) या तरुणाने स्वत:च्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली़ ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पश्चिम देवपूर पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली़ माहिती मिळताच पोलीस निरीक्षक युवराज गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली़ घटनास्थळाची पाहणी करीत माहिती जाणून घेतली़ तरुणाने आत्महत्या का केली असावी याचे स्पष्ट कारण मात्र समजू शकलेले नाही़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ मयत प्रमोद देवरे याच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे़