धुळ्यात स्टेशन मास्तरची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 20:29 IST2020-08-21T20:28:54+5:302020-08-21T20:29:44+5:30
कारण गुलदस्त्यात, पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

धुळ्यात स्टेशन मास्तरची गळफास घेऊन आत्महत्या
धुळे : धुळ्यातील रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर यांनी बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास स्वत:च्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली़ गुरुवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़
मुळचे राजस्थानमधील रहिवाशी असलेले आनंदा रमेशचंद्र गुप्ता (२९) हे धुळ्यातील रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते़ गुरुवारी सकाळी ते त्यांच्या क्वॉटरमधून बाहेर आले नाही़ त्यामुळे आजुबाजुच्यांनी तपास केला़ दरवाजाला आतून कडी लावलेली होती़ आवाज देवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने शेजारच्यांनी दरवाजाची कडी तोडली़ तर आनंदा गुप्ता क्वॉर्टरच्या छताला बेडशीटने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले़
लागलीच त्यांना खाली उतरवून वैद्यकीय उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ त्याठिकाणी डॉ़ हिमांशू सोनवणे यांनी त्यांना मृत घोषीत केले़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ घटनेचा तपास पोलीस हवालदार के़ आय़ सय्यद करीत आहेत़