Suicide of both in Shindkheda taluka | शिंदखेडा तालुक्यात दोघांच्या आत्महत्या

शिंदखेडा तालुक्यात दोघांच्या आत्महत्या

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील जुने कोडदे आणि निमगुळ या ठिकाणी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत़ याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दोनही घटनांची नोंद करण्यात आलेली आहे़ 
जुने काडदे येथील घटना
शिंदखेडा तालुक्यातील जुने कोडदे येथील रहिवाशी राजेश अशोक पवार (२३) या तरुणाने ११ आॅक्टोबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास काही तरी विषारी औषध प्राशन केले़ याचा त्याला त्रास होऊ लागल्याने ही बाब घरातील लोकांना कळाली़ त्यांनी तातडीने दोंडाईचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ अधिक उपचारासाठी त्याला धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले़ या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ पोलीस कर्मचारी साळुंखे घटनेचा तपास करीत आहेत़ 
निमगुळ येथील घटना
शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथील वृध्द रविंद्र गोबा बागल (६५) यांनी राहत्या घरी काहीतरी विषारी औषध प्राशन केले़ ही घटना ४ आॅक्टोबर रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली़ घटना लक्षात येताच त्यांना तातडीने धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले़ याप्रकरणी रविवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ पोलीस कर्मचारी पाटील घटनेचा तपास करीत आहेत़ 

Web Title: Suicide of both in Shindkheda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.