शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 06:01 PM2018-05-13T18:01:39+5:302018-05-13T18:01:39+5:30

कर्जबाजारीपणा : गावात व्यक्त होतेय हळहळ

Suicide of Bhadane farmer in Shindkheda taluka | शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील शेतक-याची आत्महत्या

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील शेतक-याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देभडणेतील शेतक-याची आत्महत्याकर्जबाजारीपणातून केल्याचा संशयगावात व्यक्त झाली हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : तालुक्यातील भडणे येथील कोमलसिंग रजेसिंग गिरासे (४०) या शेतकºयाने विष घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ 
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील शेतकरी कोमलसिंग गिरासे  हे रविवारी सकाळी त्यांच्या शेतात गेले होते़ शेतातून सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास ते घराकडे परत येत असताना बागुल यांच्या शेताजवळ पडलेले दिसून आले. मयत गिरासे यांनी त्यांच्या शेतातच विषारी औषध प्राशन करुन ते रस्त्याने चालत येत असताना पडले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे़ मयत गिरासे यांच्यावर राष्ट्रीयकृत बॅँकेचे व इतर पीक कर्ज सुमारे २ लाखाच्या आसपास होते़ त्या कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. 
शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात मयत गिरासे यांचे शवविच्छेदन करण्यात आले़ सायंकाळी भडणे गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ गिरासे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.

Web Title: Suicide of Bhadane farmer in Shindkheda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.