मजुरांअभावी उसाच्या शेताला लावली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:51+5:302021-04-06T04:34:51+5:30
यासाठी मजुरांची गरज भासत नाही, मात्र गुरांचा चारा वाया जात असतो. ज्यांच्याकडे गुरेढोरे आहेत ते मात्र मजूर उपलब्ध करण्यासाठी ...

मजुरांअभावी उसाच्या शेताला लावली आग
यासाठी मजुरांची गरज भासत नाही, मात्र गुरांचा चारा वाया जात असतो. ज्यांच्याकडे गुरेढोरे आहेत ते मात्र मजूर उपलब्ध करण्यासाठी धडपडताना दिसून येत आहेत.
तर कांदा, हरभरा या उत्पादनासाठी मजुरांची गरज असते. यासाठी सर्वत्र या कामाची धडपड दिसून येत असून ऊसतोड साठी मजूर उपलब्ध होत नाही, यामुळेच उसाला आग लावल्याचे यावेळी सांगितले.
ऊसतोडची कामे अनुभवी आदिवासी मजूरच करत असतात. उभा ऊस तोडण्यासाठी भरपूर वेळ लागतो. आधीच मजूर उपलब्ध होत नाहीत. यासाठी उसाला आग लावल्याने पांदळ, पाचोळा जळून खाक होतो व उसाचे टिपरे तोडण्यासाठी वेळ लागत नसल्यामुळे येथील शेतकरी मजुरांअभावी हा प्रयोग करताना दिसून येत आहेत. यामुळे वेळची बचत होवून काम लवकर मार्गी लागत असते.
मजुरीचा दर
प्रत्येक कामासाठी येथे मजुरीचा वेगवेगळा दर आहे
कांदा खांडणी दोनशे रुपये रोज. हरभरा कापणी एक पारगा दीडशे रुपये तर भुईमूग शेंगा निंदणी एक पारगा १२० रु. तसेच दिवसभर रोज्या माणसाचा रोज तीनशे रुपये असून सर्वत्र मालपूर परिसरात मजुरांची टंचाई भेडसावत आहे.