सुधाकर जोशी कुटुंबियांना हवी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:24 IST2019-05-16T23:24:28+5:302019-05-16T23:24:56+5:30
ब्राह्मण समाजाकडून मागणी : जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

सुधाकर जोशी कुटुंबियांना हवी मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अक्षयतृतीयेच्या दिवशी झालेल्या गॅस गळत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुधाकर ज्ञानेश्वर जोशी यांना शौर्यपदकासह त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागणीचे निवेदन ब्राह्मण समाजातर्फे जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले़
गॅस गळतीची दुर्घटना एकवीरा देवी मंदीर परिसरातील गल्ली नंबर ७ मध्ये सकाळी घडली़ सुधाकर जोशी यांनी हिंमतीने जीवाची पर्वा न करता जळते सिलेंडर घराबाहेर आणले़ घरातच स्फोट झाला असता तर वित्त व जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली असती़ त्यामुळे सुधाकर यांना शौर्य पदकासह आर्थिक मदत मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली़
यावेळी महेश मुळे, मदनलाल मिश्रा, रवी बेलपाठक, विनोद मोराणकर, डॉ़ महेश घुगरी, माधवप्रसाद वाजपेयी, लक्ष्मीकांत जोशी, दिलीप पाठक, विजय पाठक, शेखर कुलकर्णी, दिनेश कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, महेश जोशी, उपेंद्र अर्थेकर, दीपक खंडेलवाल, मुकूल धाराशीवकर, धर्मेंद्र पाठक, मेघ:श्याम दिक्षीत, रमेश जोशी, प्रमोद मुळे, जया जोशी, आऱ के़ पाठक, रविंद्र टाकणे, श्रीराम कुलकर्णी आदी उपस्थित होते़
११ हजाराची आर्थिक मदत
कै़ सुधाकर जोशी कुटुंबियांना श्री शुक्ल यजुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांच्यावतीने त्यांच्या घरी जावून ११ हजार रुपये रोख वैयक्तिक स्वरुपात देण्यात आले़ त्यांचे सात्वन देखील करण्यात आले़ यावेळी कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते़