मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सुभाष भामरे आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 09:40 IST2019-05-23T09:40:30+5:302019-05-23T09:40:57+5:30
लोकसभेचा धुळे मतदार संघ : दुस-यास्थानी काँग्रेसचे कुणाल पाटील

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सुभाष भामरे आघाडीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लोकसभेच्या धुळे मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे़ यातील पहिल्या फेरीत भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे उमेदवार डॉ़ सुभाष भामरे आघाडीवर आहेत़ त्या खालोखाल दुसºयास्थानी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील आहेत़
नगावबारी परिसरातील शासकीय धान्य गोदामात गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात करण्यात आली़ सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास झालेल्या पहिल्या फेरीत युतीचे उमेदवार डॉ़ सुभाष भामरे यांना ३५ हजार १९४ मते मिळाली़ तर कुणाल पाटील यांना २२ हजार ६० मते मिळाली आहेत़ त्यामुळे डॉ़ सुभाष भामरे आघाडीवर आले आहेत़ दरम्यान, मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे़ नागरीकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे़ तर काहींनी मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे़