शिंदखेड्यात उपजिल्हा रुग्णालय सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:39 IST2021-09-21T04:39:49+5:302021-09-21T04:39:49+5:30
दरम्यान उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ...

शिंदखेड्यात उपजिल्हा रुग्णालय सुरू करावे
दरम्यान उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. औषधी आणि यंत्रसामग्रीची उणीव आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पाच ते सहा वर्षांपासून पदे रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालयात केवळ दोनच डॉक्टर कार्यरत आहेत. कायमस्वरूपी औषध निर्माता पद सात वर्षांपासून रिक्त आहे. लॅब टेक्निशियन पद पाच वर्षांपासून रिक्त आहे. दोन परिचारिका व दोन स्वीपरच्या जागा रिक्त आहेत. पाच वर्षांपासून एक्स-रे मशीन नादुरुस्त आहे. तेथे अद्ययावत एक्स-रे मशीनची गरज आहे. पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. रुग्णालयात व्हेंटिलेटर नाही. ३० बेडचे रुग्णालय असून, २० बेड कार्यरत आहेत. रुग्णालयात सुविधा नसल्याने रुग्णांना धुळे येथे जावे लागते. शहराची लोकसंख्या वाढ लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालय करावे, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सूरज देसले यांनी केली.
दरम्यान शिंदखेडा येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या मागणीसाठी शासन दरबारी हा प्रश्न लावून धरेल, असे सुद्धा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, विनोद माळी, महेश गुरव, अक्षय वाणी, परेश शिंपी उपस्थित होते.