वडिलांचा अंत्यविधी आटोपून विद्यार्थिनीने दिला १२वीचा पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 12:04 IST2020-02-27T12:04:27+5:302020-02-27T12:04:49+5:30
वरूळची घटना : प्राचार्यांसह शिक्षकांनी दिला विद्यार्थिनीला धीर

वडिलांचा अंत्यविधी आटोपून विद्यार्थिनीने दिला १२वीचा पेपर
आॅनलाइन लोकमत
तºहाडी (जि.धुळे) :वडिलांचा अंत्यविधी आटोपल्यानंतर विद्यार्थिनीने बारावीचा इतिहाचाचा पेपर दिल्याची घटना आज वरूळ येथे घडली.
शिरपूर तालुक्यातील वरूळ येथील एच. आर. पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीत शिकणारी जयश्री एकनाथ सावळे हिचे वडिल एकनाथ गुलाब सावळे यांचे २६ फेब्रुवारी रोजी सकाळी अल्पशा आजाराने सकाळी निधन झाले. एकीकडे घरात वडिलांचा मृतदेह होता, तसेच अंत्यविधीसाठी नातेवाईक, ग्रामस्थ जमलेले होते तर दुसरीकडे जयश्रीचा बारावीचा इतिहास विषयाचा पेपर होता.
शाळेत हुशार, अभ्यासू असलेली जयश्री वडिलांच्या निधनाने पूर्णपणे खचली होती. पेपर देण्याची तिची मानसिकता नव्हती.
अशा परिस्थितीत प्राचार्य. पी.आर. साळुंके, प्रा.आर. आर. रघुवंशी, प्रा. डी.एन.माळी, एम. आर. पाटकर, एस. जे. पाटील व नातेवाईक मानसिक धीर दिला.
तºहाडी (ता. शिरपूर) येथे कै. साहेबराव सोमा पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथील परीक्षा केंद्रावर पेपर देण्यास सांगितले. दुपारी दोन वाजता वडिलांना अग्निडाग दिला जात असतांना जयश्री मोठ्या हिंमतीने तºहाडी येथे परीक्षा केंद्रावर इतिहासचा पेपर देण्यास निघाली. जयश्रीची बहीण रचना ही याच विद्यालयात दहावीत शिकत आहे. या दोन्ही बहिणींना आपल्या वडिलांच्या निधनाचे दु:ख पचवून मोठ्या धैयार्ने बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जावे लागत आहे.
एकनाथ सावळे हे वरूळ येथील लोकमतचे वितरक सुभाष सावळे यांचे मोठे भाऊ होत.