धुळ्यातील पवन नगरात तणावाची परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:07 IST2019-07-07T12:07:00+5:302019-07-07T12:07:35+5:30
पोलिसांचा बंदोबस्त : संशयितांची धडपकड होणार

धुळ्यातील पवन नगरात तणावाची परिस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील ८० फुटी रोडवरील पवन नगर भागात शनिवारी रात्री भरचौकात वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विरोध केल्याच्या कारणावरुन दोन गट आमने सामने भिडले होते़ जमाव एकमेकांवर चालून येत असल्याचे कळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता़ यावेळी किरकोळ दगडफेक देखील झाली़ तणाव वाढत असल्याचे कळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत आणि अन्य पोलीस दाखल झाले़ रविवारी सकाळी या भागात शांतता असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे़ शांतता बिघडविणाºया तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत़