धुळ्यात वाहनांवरील दगडफेकीमुळे तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:38 IST2019-03-22T21:37:33+5:302019-03-22T21:38:02+5:30

साक्री रोडवरील घटना : २५ जणांच्या टोळक्याचे कृत्य, गुन्हा दाखल

Stress due to stone racket in Dhule | धुळ्यात वाहनांवरील दगडफेकीमुळे तणाव

धुळ्यात वाहनांवरील दगडफेकीमुळे तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री रोडवरील सिंचन भवनाजवळ एका रसवंती चालकाला दमदाटी, मारहाणसह तोडफोड केल्यानंतर रस्त्यावरुन जाणारी बस, रिक्षा व कारच्या काचा फोडण्यात आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली़ २० ते २५ जणांच्या टोळक्याने हे कृत्य केल्यामुळे बराचवेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ शहर पोलिसांचे पथक येताच टोळके पसार झाले असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला़ 
शहरातील साक्री रोडवरील सिंचन भवनाजवळ देविदास चौधरी यांचे आऱ के़ रसवंती नावाचे दुकान आहे़ याठिकाणी भरत पाटील हा रसवंतीवर ऊसाची साफसफाई करत असताना २० ते २५ जणांचे टोळके जिल्हाधिकाºयांचा जमावबंदीचा आदेश असतानाही एकत्रित आले़ रसवंतीच्या दुकानावर येऊन रसवंती बंद कर, येथे आमचेच राज्य आहे़ बाहेरचा कोणीच येऊन येथे राज्य करु शकत नाही, असे म्हणत सामान अस्ताव्यस्त करत फेकून देण्यास सुरुवात करण्यात आली़ काचेचे ग्लास, ट्युबलाईट फोडून दुकानातील  गल्ल्याचा ड्रॉव्हर काढून तोडफोड करण्यास सुरुवात केली़ ऊसाच्या टिपºयाने मारहाण देखील केली़ हे टोळके एवढ्यावरच न थांबता त्याचवेळेस कुमारनगराकडून येणारी एमएच १८ एपी ०६३३, जीजे १८ झेड ३६८६ क्रमांकाची बस, एमएच १८ एजे ८६५२ क्रमांकाची कार अशा या तीन वाहनांचे नुकसान केले़ दगडफेक केल्याने वाहनांचे काच फुटले़ या तोडफोडीत सुमारे ५० हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ आरडाओरड करत धिंगाणा घातल्यामुळे साक्री रोड भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ शहर पोलिसांचे पथक येताच टोळके घटनास्थळावरुन पसार झाले आहे़ याप्रकरणी तेजस गोकूळ चौधरी (१८, रा़ जुने धुळे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार अज्ञात २० ते २५ जणांविरुध्द भादंवि कलम ३०८, १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३५२, ३२३, ५०४, ५०६, ४२७ सह मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११०, ११२ चे उल्लंघन ११७ व ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ 

Web Title: Stress due to stone racket in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.