शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पडताळणीच्या घोळामुळे ६ महिन्यांपासून रॉकेल पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:57 AM

शिरपूर तालुका : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ४२ हजाराहून अधिक लाभार्थी वंचित

शिरपूर : तालुक्यात ४२ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना गेल्या ६ महिन्यांपासून हक्काच्या केरोसीनपासून वंचित राहण्याची वेळ प्रशासकीय पडताळीच्या घोळात अडकलेली आहे़ गत आॅक्टोंबर २०१८ मध्ये लाभार्थ्यांनी हमी पत्र दिल्यानंतरही केवळ दोनदा केरोसीन मिळाले़  राज्य शासनाने आॅगस्ट २०१८ मध्ये परिपत्रक काढून गॅस जोडणी नसलेल्या शिधापत्रिकाधारकांनी हमीपत्र सादर केल्यास त्यांना पूर्ववत केरोसीनचा पुरवठा केला जाणार असल्याचे सुचित केले होते़ त्यामुळे अर्धघाऊक विक्रेते कानुमाता आॅईल डेपोमार्फत ७ हजार ६८८, सिध्दिविनायक सिध्देश्वर आॅईल डेपोमार्फत १२ हजार ५९५, विखरण येथील बी़एच़पवार यांच्याकडून ६ हजार ८३६, सांगवी येथील शनैश्वर आॅईल डेपोकडून ८ हजार ३७८, थाळनेर येथील एम़एस़दर्डा यांच्याकडून ६ हजार ९१४ असे एकूण ४२ हजार ४११ शिक्षा पत्रिकाधारकांनी आॅक्टोंबर २०१८ मध्ये तहसिलदारांकडे हमीपत्र सादर केले आहे़ त्याकरीता ७२ हजार लिटर केरोसीनची मागणी जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे करण्यात आली होती़ ते प्राप्त होताच वाटप करण्यात आले़ नोव्हेंबरमध्ये २४ हजाराची मागणी केल्यानंतर ते केरोसीन जानेवारीत मिळाले़ त्यामुळे  डिसेंबर ते आतापावेतो असे सहा महिन्यांपासून लाभार्थी करोसीनपासून वंचित आहेत़जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी २ एप्रिल २०१९ रोजी काढलेल्या स्मरणपत्रात, जानेवारी २०१९ मध्ये केरोसीन मागणीत तालुक्यात हमीपत्रांची संख्या ३ हजार ६५८ दाखविण्यात आली होती. मात्र पडताळणीत प्रमाणित न केलेल्यांची संख्या ८ हजार ३४४ अशी आढळल्यामुळे ४ हजार ६८६ हमीपत्रामध्ये तफावत आढळून आली आहे़ असे असतांना देखील केरोसीन लाभार्थ्यांचे हमीपत्रांची तलाठी/मंडळ अधिकारी यांचे मार्फत पडताळणी करून संबंधित तहसिलदारांनी सदर हमीपत्रावर प्रमाणित स्वाक्षरी करून सुधारीत फेरतपासणी अहवाल ७ दिवसाच्या आत मागविला होता़ अन्यथा पात्र केरोसीन लाभार्थ्यांची कोणतीही केरोसीन न मिळाल्याची तक्रार असल्यास तहसिलदार यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल असे देखील सूचित करण्यात आले असतांना देखील त्या पत्राकडे कानाडोळा केल्यामुळे केरोसीन धारक वंचित राहीलेत़ 

पुर्ववत केरोसीनचा पुरवठा न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा

आमदार अमरिशभाई पटेल यांनी येथील तहसिल प्रशासनाकडे शिधा पत्रिकाधारकांना केरोसीन वेळेवर देण्याची मागणी केली आहे़

शिरपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनने सुध्दा १५ मे रोजी प्रांताधिकायांना निवेदन देवून हमीपत्रानुसार केरोसीन मिळण्याची मागणी केली आहे़ हमीपत्र देवून ही केवळ दोनदा केरोसीन मिळाले आहे़ त्यामुळे गेल्या ६ महिन्यांपासून लाभार्थी केरोसीनपासून वंचित आहेत़  *प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सुध्दा या संदर्भात तहसिलदारांना निवेदन देण्यात आले़ या प्रकाराला केवळ प्रशासकीय दिरंगाई कारणीभूत असून सर्वसामान्य नागरीकांमध्ये रोष निर्माण झाला आहे़ आपल्यास्तरावर हमीपत्रांची पडताळणी बाकी असल्यामुळे केरोसीनची मागणी केली जात नाही़ त्यामुळे पडताळणीसाठी झालेला उशीर हा अक्षम्य हलगर्जीपणा आहे़ पडताळणी पूर्ण करून तातडीने केरोसीन उपलब्ध करून द्यावे़ तसे न झाल्यास २७ मे पासून तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे तालुकाप्रमुख ईश्वर बोरसे यांनी दिला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे