धुळे शहरात होणारा विजेचा लंपडाव थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:38 IST2021-08-23T04:38:19+5:302021-08-23T04:38:19+5:30

धुळे शहरातील महावितरण कंपनीच्या ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा व्हावा तसेच विविध मागण्यांसाठी आमदार फारूख शाह यांनी ऊर्जामंत्र्यांना निवेदन ...

Stop the power outage in Dhule city | धुळे शहरात होणारा विजेचा लंपडाव थांबवा

धुळे शहरात होणारा विजेचा लंपडाव थांबवा

धुळे शहरातील महावितरण कंपनीच्या ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा व्हावा तसेच विविध मागण्यांसाठी आमदार फारूख शाह यांनी ऊर्जामंत्र्यांना निवेदन देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी केली.

शहरातील ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा देणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे तसेच महावितरण कंपनीची हानी होते. त्यामुळे शहरात वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे अधिकारी व वीज ग्राहकांमध्ये वाद होतात. या पार्श्वभूमीवर शहरात महावितरणची व्यवस्था अधिक कार्यक्षम व्हावी. यासाठी शहरातील विविध भागात वीज उपकेंद्र बसवावे, नवीन वितरण रोहित्र बसविणे, वितरण रोहित्रांची क्षमता वाढविणे, जीर्ण तारा व पोल बदलणे, कंडक्टर बदलणे आदी विविध कामे करण्यासाठी निधीची तरतूद करावी.

अशा मागण्यांचे निवेदन आमदार शाह यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन दिले.

Web Title: Stop the power outage in Dhule city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.