एक्सप्रेस रेल्वेगाडींना मिळाला थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:26 IST2019-07-09T12:26:01+5:302019-07-09T12:26:23+5:30

दोंडाईचा : परिसरातील प्रवाशांना फायदा

Stop the express trains | एक्सप्रेस रेल्वेगाडींना मिळाला थांबा

दोंडाईचा रेल्वे स्थानक

लोकमत न्यूज नेटवर्क
मालपुर : खान्देश एक्स्प्रेस सह दुसºया तीन एक्स्प्रेस गाडयांना दोंडाईचा रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील मालपूर सह परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून वेळ व पैस्याची बचत होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. 
आठवडयातून धावणाºया लांब पल्ल्याच्या गाडया   खान्देश एक्सप्रेससह अजमेर पुरी एक्स्प्रेस ओखा पुरी एक्स्प्रेस, बिकानेर सिकंदराबाद, या एक्स्प्रेस गाडयांना देखील दोंडाईचा रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्यामुळे गुजरात व भुसावळ कडे जाणाºया प्रवाश्याना आता सोयीचे होणार आहे. कामा निम्मित गुजरात भुसावळ व मुंबई कडे जाणाºया  प्रवाश्याना सोयीचे झाले आहे. दोंडाईचा रेल्वे स्थानकावरून आठवडयातून सध्या २८ गाडया धावत आहेत. बांद्रा टर्मिस ते भुसावळ  या दरम्यान  खान्देश एक्स्प्रेस गाडीने गुजरात मुंबई व भुसावळ अश्या तिन्ही मार्गावर प्रवास करणे सोयीचे असल्याने खान्देश एक्स्प्रेस गाडी प्रतिदिवस करावी अशी मागणी प्रवाश्यांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Stop the express trains

टॅग्स :Dhuleधुळे