रेमडेसिव्हरचा काळाबाजार थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 22:40 IST2021-04-05T22:39:38+5:302021-04-05T22:40:01+5:30
मराठा क्रांती मोर्चाचे आरोग्यमंत्र्यांना साकडे

रेमडेसिव्हरचा काळाबाजार थांबवा
धुळे : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवावी. तसेच रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. खासगी तसेच सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांना व्हेंटिलेटर बेड वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेकांचा बळी गेला आहे. रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा आहे. काही औषधविक्रेते आपत्तीमध्ये गैरफायदा घेत आहेत. काळा बाजार करुन जास्त दराने इंजेक्शनची विक्री होत आहे. गरजू रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची लूट सुरू आहे. त्यामुळे इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध करुन काळा बाजार थांबवावा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्याध्यक्ष प्रदीप जाधव, सचिव निंबा मराठे, सहखजिनदार विरेंद्र मोरे, छावा संघटनेचे नाना कदम, विश्व मराठा संघाचे दुष्यंत देशमुख, अर्जुन पाटील, सुधीर मोरे, संदीप शिंदे, रवींद्र शिंदे, विनोद जगताप, अमर फरताडे, विकास मराठे, शाम निरगुडे, कुणाल पवार, रणजित भोसले, हिमानी वाघ, हेमा हेमाडे आदींच्या सह्या आहेत.