रूनमळी गावात पोलिसांवर दगडफेक, धुळ्याहून पोलिसांचा फौजफाटा रवाना
By देवेंद्र पाठक | Updated: July 27, 2023 16:38 IST2023-07-27T16:37:26+5:302023-07-27T16:38:12+5:30
संतप्त जमाव लक्षात घेता निजामपूर पोलिसांना वाहनासह काढता पाय घेण्याची वेळ आली.

रूनमळी गावात पोलिसांवर दगडफेक, धुळ्याहून पोलिसांचा फौजफाटा रवाना
धुळे : तरुणीची छेड काढल्याच्या कारणावरून साक्री तालुक्यातील रूनमळी गावात दोन गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. निजामपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पथक रवाना झाले. पण, संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला.
संतप्त जमाव लक्षात घेता निजामपूर पोलिसांना वाहनासह काढता पाय घेण्याची वेळ आली. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळताच अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि धुळ्याहून पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी रवाना झाला. रूनमळी गावात तणावाचे वातावरण आहे.