धुळे: शहरात प्रथमच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई करत 17 लाख रुपये किमतीचे एमडी (MD) ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईमुळे धुळे शहरात खळबळ उडाली आहे. एमडीसारखे महागडे आणि घातक ड्रग्ज शहरात कोणासाठी आणले जात होते, याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ड्रग्जसह एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
* सैय्यद अतिक सैय्यद (रा. मालेगाव) * मजहर खान युसूफ खान (रा. राजस्थान)
हे ड्रग्ज धुळ्यामध्ये कोणाला विकले जाणार होते किंवा कोणत्या मोठ्या रॅकेटचा हा भाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करीत आहे. पोलीस या ड्रग्जच्या साखळीतील इतर लोकांचा आणि मुख्य सूत्रधाराचा कसून शोध घेत आहेत.
Web Summary : Dhule police seized ₹17 lakh worth of MD drugs, arresting two individuals from Malegaon and Rajasthan. Investigations are underway to uncover the drug's intended recipients and any larger network involved. Police are actively searching for other individuals involved in the drug ring.
Web Summary : धुले पुलिस ने ₹17 लाख मूल्य का MD ड्रग्स जब्त किया, जिसमें मालेगांव और राजस्थान के दो व्यक्तियों को गिरफ्तार किया गया। ड्रग्स के इच्छित प्राप्तकर्ताओं और इसमें शामिल किसी भी बड़े नेटवर्क का पता लगाने के लिए जांच चल रही है। पुलिस ड्रग रिंग में शामिल अन्य व्यक्तियों की सक्रिय रूप से तलाश कर रही है।