अजूनही चारच्या आत घरातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:43 IST2020-08-07T12:43:22+5:302020-08-07T12:43:35+5:30
वेळेची मर्यादा वाढवावी, व्यापाऱ्यांची मागणी : अहवालानंतर चर्चेअंती निर्णय : जिल्हाधिकारी

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असतानाच व्यापारी प्रतिष्ठानांची वेळ वाढवून देण्याची मागणी सध्या होत आहे़ यावर मंथन सुरु असून आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून अहवाल आल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत दुपारी ४ वाजेपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने सुरु असल्यामुळे ‘चारच्या आत घरात’ अशीच काहीशी स्थिती पहावयास मिळत आहे़
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने लॉकडाऊन ते अनलॉकडच्या तिसºया टप्यापर्यंत व्यापाऱ्यांकडून शासन निर्णयाचे पालक केले जात आहे़ चार महिन्यापासून व्यापारी आर्थिक अडचणीला सामोरे जात आहे़ प्रशासनाने सम-विषम तारखेचा निणय रद्द करून बाजारपेठ पूर्ववत सुरू करावी अशी मागणी पारोळारोड व्यापारी संघटनेकडून नुकतीच महापालिका प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे़ तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ नये़ यासाठी दुकाने सम-विषम तारखेनुसार सुरू ठेवण्याचे आदेश व्यापाºयांना देण्यात आले़ मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत असल्याने प्रशासनाने दुकानांची वेळ वाढवावी़ अशी मागणी यापुर्वीच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांच्यावतीने यापुर्वीच करण्यात आली़
लॉकडाऊनच्या अनुषंगाने सध्या हा एकमेव विषय चर्चेत आला आहे़ संघटनेच्यावतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देवून वेळ वाढवून देण्यासंदर्भात मागणी केली आहे़
त्याचप्रमाणे सध्याच्या परिस्थितीत महापालिका आणि पोलीस प्रशासन हे दोन विभाग मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत़ फिल्डवर त्यांचा वावर सर्वाधिक आहे़ कोरोनाची आकडेवारी दिवसागणिक वाढत असताना कमी देखील होत आहे़ बाजारपेठेतील गर्दीवर त्याचे कमी - अधिक पडसाद उमटत आहेत़ व्यापारी प्रतिष्ठानांची वेळ वाढवून देणे योग्य असेल की नाही यासंदर्भात आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून अहवाल मागितला आहे़ यावर मंथन होऊन योग्य तो निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी म्हणाले़