लोकसहभागातून साकारणार छत्रपती महाराजांचा पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:25 IST2021-07-10T04:25:13+5:302021-07-10T04:25:13+5:30
सभेच्या सुरुवातीला छत्रपती राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. ...

लोकसहभागातून साकारणार छत्रपती महाराजांचा पुतळा
सभेच्या सुरुवातीला छत्रपती राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ. सुभाष भामरे होते. बैठकीत भगवान करणकाळ, साबीर शेख, श्यामकांत सनेर, शव्वाल अन्सारी, हिरामण गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच महापोैर चंद्रकांत सोनार, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, एम. जी. धिवरे, मोहन नवले, किरण शिंदे, अनुप अग्रवाल, दरबारसिंग गिरासे, अशोक सुडके, प्रा. डॉ. वैशाली पाटील, कैलास चौधरी, सुनील महाले, शीतल नवले, संजय पाटील, सुधाकर बेंद्रे, राजेंद्र इंगळे, विजय देवकर, मनोज मोरे, भोला वाघ, विनायक शिंदे, आबा कदम, कुणाल पवार, जितेंद्र शिरसाठ, शिवाजी पवार, पृथ्वीराज शिंदे, गोपी धिवरे आदी उपस्थित होते. खासदार डॉ. सुभाष भामरे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांचे वंशजच आपल्या धुळ्यात आहेत. त्यामुळे पूर्णाकृती पुतळ्यासाठी समिती स्थापन करण्याचे सर्व अधिकार राजवर्धन कदमबांडे यांना द्यावेत असे सर्वानुमते ठरले. या वेळी खासदार भामरे यांनी पूर्णाकृती पुतळ्यासाठी वैयक्तिक १ लाख ११ हजार रुपये देणगी जाहीर केली. तर यशवर्धन कदमबांडे यांनी पुनश्च ५१ हजार रुपये असे एकूण १ लाख १ हजार रुपये जाहीर केले.
प्रास्ताविक हेमंत मदाने यांनी केले, आभार निंबा मराठे यांनी मानले.