शिरपूर प्रांताधिकाऱ्यांमार्फत न्यायालयीन चाैकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:36 AM2021-04-16T04:36:56+5:302021-04-16T04:36:56+5:30

दोंडाईचा येथे ३१ मार्चला अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपी विरोधात पोस्को कायद्याद्वारे गुन्हा दाखल केला ...

Starting with the court check through Shirpur prefecture | शिरपूर प्रांताधिकाऱ्यांमार्फत न्यायालयीन चाैकशी सुरू

शिरपूर प्रांताधिकाऱ्यांमार्फत न्यायालयीन चाैकशी सुरू

Next

दोंडाईचा येथे ३१ मार्चला अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपी विरोधात पोस्को कायद्याद्वारे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी लुल्या ऊर्फ शरीफ शेख सलिम व इम्रान शेख सलीम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना सोडून द्यावे या मागणीसाठी सुमारे २०० लोकांच्या जमावाने दोंडाईचा पोलिसांवर हल्ला केला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व उपनिरीक्षक दिनेश मोरेसह तीन पोलीस जखमी झाले. यात दोन्ही ताब्यात असलेल्या आरोपींना पळवून नेत असताना वारे यांनी गोळीबार केला. यात दोघे जखमी झाले हाेते.

१ एप्रिलला नगरपालिकेच्या सभागृहात आमदार जयकुमार रावल यांचा प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी संजय यादव यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी गुरुवारपासून प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी सुरू केली आहे. पोलीस स्टेशन व पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी १९ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दाेन दिवस सुरू राहणाऱ्या या चाैकशीवेळी कोणाला काही माहिती द्यायची असेल त्यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर द्यावी.

Web Title: Starting with the court check through Shirpur prefecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.