मालपूरला पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:15 IST2020-03-14T14:14:35+5:302020-03-14T14:15:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे आमचा गाव आमचा विकास योजनेंतर्गत गावातील वॉर्ड क्रमांक दोन मधील ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे आमचा गाव आमचा विकास योजनेंतर्गत गावातील वॉर्ड क्रमांक दोन मधील पाटील वाडा येथे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांना सुरुवात झाली.
यासाठी दोन लाख ९९ हजार रुपयांचा कृती आराखडा मंजूर झाला आहे. त्यातून गावात विकास कामांना ग्रामपंचायत प्रशासनाने सुरुवात केली आहे. वॉर्ड क्रमांक दोन मधील पाटील वाडा येथे जेसीबी यंत्राच्या साहाय्याने भराव काढून कामाला प्रत्यक्ष गल्लीतल्या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाला सुरुवात झाली. यावेळी प्रभाकर पाटील, रवींद्र पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, गोपाल शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.