दहिवेल परिसरात कोविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST2021-04-05T04:31:50+5:302021-04-05T04:31:50+5:30
यासंदर्भात साक्री येथील तहसीलदार प्रवीण चव्हाणके, पिंपळनेरचे अपर तहसीलदार विनायक थविल, साक्री पं.स. गट विकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी तसेच ...

दहिवेल परिसरात कोविड सेंटर सुरू करा
यासंदर्भात साक्री येथील तहसीलदार प्रवीण चव्हाणके, पिंपळनेरचे अपर तहसीलदार विनायक थविल, साक्री पं.स. गट विकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी नवले यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, साक्री तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. पश्चिम पट्ट्यातील दहिवेल, नवापाडा, शिरसोले, रोहोड या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या दहिवेल, मालनगाव, सुरपान, धनेर, तारखोडी आदी गावात दररोज करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. परिणामी, येथील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या चारही आरोग्य केंद्रांतर्गत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे. तसेच साक्री व पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी. कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या सोशल डिस्टन्सिंगसह विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची तपासणी करून
त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.