धुळे जिल्ह्यात अकरावीच्या  प्रवेश प्रकियेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 17:39 IST2018-06-22T17:39:56+5:302018-06-22T17:39:56+5:30

२५ हजार ६०० जागा  : २९ रोजी पहिली यादी जाहीर होणार

Start of eleventh entry in Dhule district | धुळे जिल्ह्यात अकरावीच्या  प्रवेश प्रकियेस प्रारंभ

धुळे जिल्ह्यात अकरावीच्या  प्रवेश प्रकियेस प्रारंभ

ठळक मुद्देकला शाखेच्या १३ हजार जागाविज्ञान शाखेच्या १० हजार जागापहिली गुणवत्ता यादी २९ रोजी जाहीर होणार

आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यात शुक्रवारपासून इयत्ता ११ वीसाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित अशा सर्व व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या एकूण २५ हजार ६०० जागा आहेत. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २९ जून रोजी लागणार आहे. 
दहावीसाठी जिल्हयातील   २९ हजार ९८ विद्यार्थी  प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २५ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
जिल्हयातील धुळे शहर, ग्रामीण, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात सर्व व्यवस्थापनाच्या कला शाखेसाठी एकूण प्रवेश क्षमता १३ हजार २४० आहे. तर विज्ञानाची प्रवेश क्षमता १० हजार ८०, वाणिज्य शाखेची १ हजार ४०, संयुक्त १ हजार २४० अशा एकूण २५ हजार ६०० जागा आहेत.  
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज २२ ते २६ जून दरम्यान वितरीत करण्यात येतील. २९ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सवंर्गनिहाय पहिली गुणवत्ता व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. ३ जुलै १८ पर्यंत पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान आज प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज, माहिती पुस्तिका घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची गर्दी झालेली होती. सोमवारपासून प्रवेश घेणाºयांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.


 

Web Title: Start of eleventh entry in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.