मुलबाळ होत नसल्यामुळे विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:26 IST2019-11-29T22:25:48+5:302019-11-29T22:26:07+5:30
शिरपूर : साकवद येथील पतीसह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

मुलबाळ होत नसल्यामुळे विवाहितेची आत्महत्या
शिरपूर : तालुक्यातील साकवद येथील एका २५ वर्षीय विवाहितेला मुलबाळ होत नसल्यामुळे सासरील मंडळी त्रास देत होते़ या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याची घटना घडली़ याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह ५ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
मे २०११ मध्ये भाग्यश्री हिचे लग्न चेतन धनराज चव्हाण रा़साकवद ता़शिरपूर याचेशी करण्यात आले होते़ लग्नानंतर काही दिवसांनी तिला मुलबाळ होत नसल्यामुळे सासरे धनराज चव्हाण, सासु वंदनाबाई, आजलसासु, दीर विलास चव्हाण हे वारंवार तिला मानसिक त्रास देत होते़ मुलबाळ होण्यासाठी लागणाºया दवाखान्याचा खर्च भागविण्यासाठी सतत पैशांची मागणी केली जात होती़
२८ रोजी संध्याकाळच्या सुमारास भाग्यश्री हिने विषप्राशन केल्याची माहिती फिर्यादी दीपक रघुनाथ कोळी रा़साळवे ता़शिंदखेडा यास जिजबहिण रूपाली विलास कोळी रा़साकवद हिने कळविली़ त्यामुळे दीपकसह काही आप्तजण लागलीच येथील उपजिल्हा रूग्णालयात आलेत, मात्र त्यापूर्वीच बहिण भाग्यश्रीचा मृत्यु झाल्याचे समजले़ सासरील मंडळीच्या त्रासाला कंटाळून तिने विष घेतले़ दरम्यान, घटनास्थळावरून सासरील मंडळी गायब झाली़ जोपर्यंत आरोपी जेरबंद होत नाही तोपर्यंत प्रेत न घेण्याचा निर्णय माहेरील लोकांनी घेतला़ त्यामुळे २९ रोजी दुपारपर्यंत प्रेत न घेण्याचा निर्णय आप्तजणांनी घेतला़ अखेर पोलिस प्रशासनाने आरोपींना जेरबंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आाले़
मयताचा भाऊ दीपक कोळी याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिस ठाण्यात पती चेतन चव्हाण, सासरे धनराज चव्हाण, सासु वंदनाबाई, आजलसासु, दीर विलास चव्हाण सर्व राहणार साकवद यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भांदवि कलम ३०६, ४९८, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत आरोपी जेरबंद झालेले नव्हते़