राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 15:25 IST2018-11-27T15:23:05+5:302018-11-27T15:25:22+5:30

खेळांवर आधारित नृत्य सादर

Sports Day to SVKM | राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात

राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : धुळे येथील एस.व्ही.के.एम. सीबीएसई स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा मेनन यांच्या हस्ते  मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. शाळेत विद्यार्थ्यांना स्केटिंग, मार्शलआर्ट, क्रिकेट, फुटबॉल यांसारखे विविध खेळ शिकवले जातात या खेळांवर आधारित विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका  सुनंदा मेनन म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर क्रीडा क्षेत्रातील विविध प्रकारात  पारंगत व्हावे व मेजर ध्यानचंद यांच्या प्रमाणे देशासाठी कार्य करावे. शाळेतील क्रीडा शिक्षक अरुण मिश्रा, रतिलाल पाडवी, पल्लवी जोशी व स्नेहा सैनी यांनी कार्यक्रम संयोजकाची भूमिका पार पाडली.

Web Title: Sports Day to SVKM

टॅग्स :Dhuleधुळे