विशेष सभेत घेणार सभापती पाणी पुरठ्यावर निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST2021-04-05T04:31:59+5:302021-04-05T04:31:59+5:30
शहरातील पाणीप्रश्नावर नेहमी महापालिकेच्या सभेत नगरसेवकांकडून तक्रारी करण्यात येत आहे. पाणीप्रश्न हा अतिशय महत्त्वाचा व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ...

विशेष सभेत घेणार सभापती पाणी पुरठ्यावर निर्णय
शहरातील पाणीप्रश्नावर नेहमी महापालिकेच्या सभेत नगरसेवकांकडून तक्रारी करण्यात येत आहे. पाणीप्रश्न हा अतिशय महत्त्वाचा व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, महापालिका प्रशासनाचे नियोजन कोलमडत असल्याने त्याचा फटका नागरिकांना भर उन्हाळ्यात बसत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतात मुबलक पाणी उपलब्ध आहे. परंतु पाणीपुरवठा करतांना नियोजन कोलमडत असल्याने नागरिकांना सात ते आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. त्यात आता उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. तापमानाचा पारा ४० अंशांवर गेला आहे. पाण्याची मागणी वाढल्याने किमान नियमित दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. पाणी विकत घ्यावे लागत आहे. सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना नियमित पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पाणी असतांनाही त्याचे नियाेजन होत नसल्याने टंचाई जाणवते.