शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

परवाना नसलेल्या कंपन्यांच्या बियाण्याचा साठा आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 12:37 IST

कृषी केंद्र मालकासह कंपनीच्या अधिका-यांविरुद्ध शिरपूर पोलिसात गुन्हा  

ठळक मुद्देपरवाना नसलेल्या तीन कंपन्यांच्या बियाण्याचा साठानोटीस बजावल्यानंतर खुलासा केला नाही, प्रमाणपत्रही दाखविले नाही शिरपूर पोलिसांत चौघांविरूद्ध गुन्हा 

शिरपूर - शहरातील आशिष सिड्स  येथे बियाणे परवाना नसलेल्या तीन कंपनीच्या भाजीपाला बियाणे आढळल्या प्रकरणी जिल्हा  गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी येथील पोलिसात  दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात दोन लाख २९ हजार सहाशे ९२ रुपयांचे बियाणे आढळले आहे.   जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा बियाणे निरीक्षक मनोजकुमार रमेश शिसोदे यांनी २५ फेब्रुवारी रोजी आशिष सिड्स येथे मे.एच.एम. क्लॉज इंडिया प्रा.लि. मेडचल तेलंगाणा, सफल सिड्स अँड बायोटेक प्रा.लि. जालना व शिवनेरी क्रॉप केअर सायन्स प्रा.लि. नाशिक या कंपन्यांनी उत्पादित केलेले विविध भाजीपाला पिकांचे बियाणे विक्रीस ठेवलेले आढळून आले. सदर कंपन्यांचे शोध प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. शिसोदे यांना शंका आल्याने त्यांनी साठा विक्रीचा बंदीचा आदेश दिला. सदर कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली व त्यांच्याकडून उत्पादन व विक्रीचा परवाना खुलासा मागविण्यात आला. मात्र मे.एच.एम. क्लॉज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मेडचल तेलंगणा यांचा खुलासा व प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही.            या कारवाईत आढळून आलेले बियाणे  मे.एच.एम. क्लॉज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मेडचल तेलंगणा या कंपनीचे काकडी बियाणे वाण इनक्लॉज २७ पाकिटे किंमत १९४२४ रुपये, गिलके वाण मयूर ३४  पाकिटे किंमत ७७२२ रुपये, कारले वाण अमृत ३१ पाकिटे किंमत ६९७५ , भोपळा गुवामल दहा पाकिटे किंमत ४५०० रुपये असे एकूण ३८ हजार ६३७ रुपये किमतीचे बियाणे आढळले.सफल सीड्स अंड बायोटेक जालना कंपनीचे  भोपळा वाण गब्बर ३७ पाकिटे किंमत १५९१० रुपये,खरबूज वाण रोमियो ३९ पाकिटे किंमत ५३८२०,मिरची वाण सिंघम ३५ पाकिटे १८३७५,टरबूज वाण स्वीटहार्ट ३९ पाकिटे किंमत  ८१९००,काकडी वाण नंदिनी दहा पाकिटे किंमत ७८५० रुपये असा एकूण १ लाख ७१ हजार ८५५ रुपये किमतीचे बियाणे आढळले.शिवनेरी क्रॉप  केअर सायन्स प्रा.लि. नाशिक कंपनीचे  भेंडी वान ओंकार ९  पाकिटे किंमत १२३७५ रुपये,चवळी वाण पंचवटी २१  पाकिटे किंमत ६८२५ रुपये एकूण १९ हजार २०० रुपये असा तिन्ही कंपन्यांचे मिळून २ लाख २९ हजार ६९२ रुपये किमतीचे बियाणे मिळाले.    याप्रकरणी शिसोदे यांच्या तक्रारीनुसार मे.एच.एम. क्लॉज इंडिया प्रा.लि. मेडचल तेलंगाणाचे वितरण व्यवस्थापक शिव बिलास सिंग, सफल सिड्स अँड बायोटेक प्रा.लि. जालनाचे व्यवस्थापक भाऊसाहेब बाजीराव मोरे, शिवनेरी क्रॉप केअर सायन्स प्रा.लि. नाशिकचे संचालक किशोर चिंतामण निकाळजे व शहरातील आशिष सिड्सचे मालक आशिष भटूलाल अग्रवाल यांच्यावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळेagricultureशेती