अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:39 IST2021-08-19T04:39:24+5:302021-08-19T04:39:24+5:30
धुळे - अनलॉक झाल्यानंतर अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील अपघात विभागात गर्दी वाढली आहे. मागील ...

अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी
धुळे - अनलॉक झाल्यानंतर अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील अपघात विभागात गर्दी वाढली आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आलेले होते. त्यामुळे खासगी व सार्वजनिक वाहतूक सेवाही बंद करण्यात आल्या होत्या. याकाळात रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी झाली होती. परिणामी अपघातही थांबले होते; मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर अनलॉक करण्यात आले. त्यानंतर पुन्हा अपघातांचे सत्र सुरु झाले आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे.
दारू हेही एक कारण
- अनलॉक झाल्यानंतर सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरु झाली असून अपघातांची संख्याही वाढली आहे.
- काही अपघात हे दारू पिऊन वाहन चालविल्याने देखील झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातात समोरून येणारे व नियमांचे पालन करणारे वाहन चालक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागातील आकडेवारी काय सांगते ?
अनलॉकआधी - ४
अनलॉकनंतर - १८
अपघातांची आकडेवारी
जून २०१९
अपघात
जखमी
मृत्यू
जून २०२०
अपघात
जखमी
मृत्यू
जून २०२१
अपघात
जखमी
मृत्यू
ऑगस्ट २०२१ (१५ तारखेपर्यंत )
अपघात
जखमी
मृत्यू