धुळ्यात महिलेच्या गळ्यातून सोनपोत ओरबाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 11:38 IST2019-08-28T11:37:53+5:302019-08-28T11:38:16+5:30

५२ हजारांचा मुद्देमाल, पोलिसात गुन्हा दाखल, महिलांमध्ये भीती

Sonpot shouted from the throat of a woman in the mist | धुळ्यात महिलेच्या गळ्यातून सोनपोत ओरबाडली

धुळ्यात महिलेच्या गळ्यातून सोनपोत ओरबाडली

धुळे : शहरात पुन्हा एकदा चेनस्रॅचिंगच्या घटना घडण्यास सुरुवात झाली असल्याचे समोर येत आहे़ देवपुरातील संभाजी उद्यानासमोरुन पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातून सोनपोत ओरबाडून नेल्याची घटना सोमवारी भरदिवसा घडली़ लंपास करण्यात आलेली सोनपोत सुमारे ५२ हजाराची आहे़ 
देवपुरातील नकाणे रोड, प्रमोद नगरातील सेक्टर नंबर २ मध्ये राहणारी नलिनी प्रशांत साळुंखे (३५) या प्राध्यापक महिलेने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, नलिनी साळुंखे या सोमवारी दुपारी साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास देवपुरमधील संभाजी उद्यानासमोरुन रस्त्याने पायी जात होत्या़ शाहू नगर बोर्डाजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५२ हजार ५०० रुपये किंमतीची २५ ग्रॅम वजनाची सोनपोत ओरबाडून नेली आहे़ या घटनेनंतर प्राध्यापक महिलेने आरडाओरड केली़ पण, त्याचा काही उपयोग झाला नाही़ भेदरलेल्या अवस्थेत ही प्राध्यापक महिला पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात पोहचली़ आपबिती कथन केल्यावर सोमवारी दुपारी उशिरा फिर्याद दिली़ 
त्यात, काळ्या रंगाच्या एका मोटारसायकलीवर आलेल्या २० ते २५ वयोगटातील तरुणांपैकी पाठीमागे असलेल्या तरुणाने निळ्या रंगाचा टी शर्ट परिधान केला होता़ असे वर्णन फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़ पोलीस उपनिरीक्षक एस़ पी़ तिगोटे घटनेचा तपास करीत आहेत़  
चेनस्रॅचिंग करणाºया चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिलेले आहे़ चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरा लावायला हवा़ 

Web Title: Sonpot shouted from the throat of a woman in the mist