वृध्देच्या गळ्यातील सोनपोत हिसकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:39 IST2019-05-12T22:38:45+5:302019-05-12T22:39:16+5:30
धुमस्टाईल चोरी : दोघांविरुध्द गुन्हा दाखल

वृध्देच्या गळ्यातील सोनपोत हिसकावली
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुमस्टाईल आलेल्या दुचाकीवरील दोघांनी वृध्देच्या गळ्यातील साडेतोळे वजनाची सोनपोत हिसकावून पोबारा केल्याची घटना मार्केटयार्ड परिसरात रविवारी सायंकाळी घडली़
मधुबाला मोतीलाल ओसवाल (५८, ऱा़ नित्यानंद नगर, धुळे) या महिलेने आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, लहान मुलाला रस्त्यावरुन फिरवित असताना दोन जण भरधाव वेगाने दुचाकीवरुन आले़ त्यांनी या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोनपोत खेचली़ भादंवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़