वृध्देच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडली; देवपुरातील भगवती नगरातील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: July 13, 2023 19:11 IST2023-07-13T19:11:25+5:302023-07-13T19:11:39+5:30
देवपूर परिसरातील भगवतीनगरात राहणाऱ्या एका वृध्द महिलेच्या गळ्यातील सोनपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने धूम स्टाईल ओरबाडत पोबारा केला.

वृध्देच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडली; देवपुरातील भगवती नगरातील घटना
धुळे: देवपूर परिसरातील भगवतीनगरात राहणाऱ्या एका वृध्द महिलेच्या गळ्यातील सोनपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने धूम स्टाईल ओरबाडत पोबारा केला. ही घटना मंगळवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली. शुभांगी उदय पुराणिक (वय ६०, रा. नाशिक, हमू इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ) या वृध्द महिलेने देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार, मंगळवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास त्या गणपती मंदिराजवळ आलेल्या असताना पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघा तरुणांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडून घेतली आणि पळून गेले. यावेळी महिलेने प्रतिकार केला. यात एका चाेरट्याला त्याच्या बोटाला जोराचा चावा घेऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना अपयश आले. त्यांनी देवपूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन दोन अनोळखींविरोधात देवपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संगीता राऊत करीत आहेत.