धुळे आगारातील १३३ पैकी काही बसेसनी सोडली अर्धा रस्त्यात साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST2021-02-11T04:37:55+5:302021-02-11T04:37:55+5:30
महाराष्ट्रासह अन्य दोन राज्याच्या सीमेवरील धुळे जिल्हा आहे. येथील मुख्य आगारात सद्या १३३ बसेस आहे. त्यात शिवशाही व अन्य ...

धुळे आगारातील १३३ पैकी काही बसेसनी सोडली अर्धा रस्त्यात साथ
महाराष्ट्रासह अन्य दोन राज्याच्या सीमेवरील धुळे जिल्हा आहे. येथील मुख्य आगारात सद्या १३३ बसेस आहे. त्यात शिवशाही व अन्य बसेसचा समावेश आहे. मुंबई, पुणे, मध्य प्रदेश, गुजरात, नाशिक, औरगाबाद अशा लांब पल्ल्याचा प्रवासाची सुविधा एसटी महामंडळामार्फेत प्रवाशांना पुरविली जाते. जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर व धुळे तालुक्यातील मुख्य गावांना जोडणारे रस्ते चांगले आहेत. बहुतांश ग्रामीण भागातील रस्त्यांची आजही दुरवस्था आहे. या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे बसेस पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले असून, इतर तांत्रिक कारणांमुळेही रस्त्यात बसेस बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत.
एसटीचा प्रवास, आरामदायी व सुरक्षित होण्यासाठी धुळे आगार व एसआयडी अवधान येथील आगारातून बसेची तपासणी केली जाते. त्यानंतर बसेस बाहेरगावी पाठविल्या जातात. त्यासाठी चालकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.
दहा वर्षापुढील ९७ बसेस
धुळे आगाराकडे १३३ बसेस आहेत. त्यापैकी १० वर्षापुढील ९७ बसेस आहेत. त्यातील आतापर्यंत ५५ बसेसची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर १० ते १२ बसेस खराब होण्याच्या मार्गावर आहे. मात्र सद्या त्या सुरू आहेत. त्यामुळे या बसेस ग्रामीण भागात वापरल्या जातात. दरवर्षाला २ ते ३ बसेस भंगार जमा होतात.
रस्त्यात एसटी बंद पडल्याची कारणे
रस्त्यामध्ये कधी ब्रेक डाऊन झाल्यामुळे बस बंद पडते किंवा टायर पंक्चर झाल्यामुळे बंद पडत असल्याचे सांगण्यात आले. कधी-कधी अचानक इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्यावरही बस बंद पडत आहेत. तसेच जर बस बंद पडली तर तत्काळ दुसऱ्या जवळच्या आगारातून बस उपलब्ध करून दिली जाते.
दहा वर्षांवरील मोजक्याच बसेस
धुळे आगारात बोटावर मोजण्या इतक्याच बसेस जुन्या आहेत. तर बहुतांश बसेस या १ ते ८ वर्षांच्या वयोमान दरम्यानच्या आहेत. जिल्ह्यातील आगारांमध्ये जास्तीत-जास्त १२ वर्षांपर्यंत बसेसचा वापर केला जात आहे.
दुरुस्तीसाठी वर्षाला ५ ते ६ कोटी खर्च
धुळे आगाराच्या बसेस अवधान एमआयडीसी विभागात दुरुस्ती होते. इंजिन दुरुस्ती, गियर बॉक्स, अपघातग्रस्त वाहनाची दुरुस्ती, दारे-खिड्यांची दुरुस्ती आदी विविध प्रकारच्या दुरुस्तीसाठी अंदाजे ५ ते ६ कोटी रुपयांचा खर्च येतो, अशी माहिती सूत्राकडून देण्यात आली.