टीका करण्यापूर्वी धुळेकरांचे प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:41 IST2021-09-23T04:41:25+5:302021-09-23T04:41:25+5:30
धुळे भाजपाचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल खासदार किरीट सोमया यांचा हवाला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. टीका करणे ...

टीका करण्यापूर्वी धुळेकरांचे प्रश्न सोडवा
धुळे भाजपाचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल खासदार किरीट सोमया यांचा हवाला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. टीका करणे हा विरोधी पक्षाचा नैतिक अधिकार आहे. मात्र टीका करणाऱ्यामध्ये तेवढे नैतिक बळ आहे का? टीका करण्यापूर्वी आधी शहरात कोणती ऐतिहासिक कामगिरी केली. याचाही विचार करावा असा सवाल शिवसेनेचे महानगराध्यक्ष मनोज मोरे यांनी केला आहे. महापालिकेने एकहाती सत्ता मिळवत आजपर्यंत कोणत्याही पक्षाचे ५० नगरसेवक निवडून आले नव्हते असा विक्रम केला. धुळेकरांना खोटी विकासाची स्वप्न दाखवित महापालिकेवर सत्ता मिळवत. महापालिकेच्या माध्यमातून शासनाची लूट केली जात आहे. शहरातील निकृष्ट कामे व दर्जाहीन रस्ते तसेच रस्त्यावर रस्ते दाखवून खोटे बिलं काढण्याचा उद्योग मनपातील सत्ताधारी करीत आहे. शहरात चालायला रस्ते नाहीत देवपूर परिसरातील नागरिक तर अक्षरशः नरकयातना भोगत आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्तोत्रामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही नागरिकांना दहा ते बारा दिवसाआड पाणी मिळत आहे. १४ कोटी रुपयांचा ठेका देऊन ही डेंग्यू व मलेरिया सारख्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. नगरसेवकांमध्ये नाराजी असतांना ही पैशाच्या बळावर महापौर निवडणुकीत भाजपचा महापौर ५० पैकी ५० मते घेऊन निवडून आला आहे. राज्यात कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परंतु हे भाजपला पहावले जात नसल्याने किरीट सोमयाच्या माध्यमातून आरोपपत्यारोप केले जात असल्याने देखील पत्रकात मनोज मोरे यांनी म्हटले आहे.