गर्दीच्या धास्तीने पैसे देऊन घेतली लस आतापर्यंत ६२६० नागरिकांनी घेतली खाजगी रुग्णालयात लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:24 IST2021-07-11T04:24:44+5:302021-07-11T04:24:44+5:30

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर खाजगी रुग्णालयातही २५० रुपयात कोवॅक्सीन व कोव्हीशील्ड लस टोचली जात होती. सध्या खाजगी रुग्णालयात ...

So far, 6,260 people have been vaccinated at private hospitals | गर्दीच्या धास्तीने पैसे देऊन घेतली लस आतापर्यंत ६२६० नागरिकांनी घेतली खाजगी रुग्णालयात लस

गर्दीच्या धास्तीने पैसे देऊन घेतली लस आतापर्यंत ६२६० नागरिकांनी घेतली खाजगी रुग्णालयात लस

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर खाजगी रुग्णालयातही २५० रुपयात कोवॅक्सीन व कोव्हीशील्ड लस टोचली जात होती. सध्या खाजगी रुग्णालयात लस मिळणे बंद झाले आहे. कोरोना लसीकरणासाठी मनपाच्या लसीकरण केंद्रांवर तसेच ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रांवर मोठी गर्दी उसळत आहे. जिल्ह्यत लसीकरणाला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लसीकरण केंद्राबाहेरील गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोकाही संभवतो त्यामुळे शहरातील ६ हजार २६० नागरिकांनी खाजगी रुग्णालयात पैसे देऊन लस टोचून घेणे पसंत केले आहे.

लसीकरणासाठी जाऊन कोरोना आणणे परवडत नाही -

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी गेल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे खाजगी रुग्णालयात लस घेतली.

- मीनाक्षी चौधरी, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी

खाजगी रुग्णालयात लसीकरणासाठी गर्दी कमी असते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या उद्देशाने खाजगी रुग्णालयात जाऊन लस घेतली. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केले तर कोरोनाला हद्दपार करू शकतो.

- नितीन सूर्यवंशी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक

शासकीय रुग्णालयात का नाही ?

१ शासकीय लसीकरण केंद्राच्या ठिकाणी लस घेण्यासाठी गर्दी उसळत असल्याने त्याठिकाणी लस घेणे टाळले अशी माहिती मिळाली.

२ खाजगी रुग्णालयात लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या शासकीय लसीकरण केंद्राच्या तुलनेत कमी होती. त्यामुळे खाजगी रुग्णालयाला प्राधान्य दिले.

३ शासकीय लसीकरण केंद्रावर मोठ्या रांगा लागत आहेत. तसेच पहाटे चार ते पाच वाजेपासून नागरिक गर्दी करत आहेत.

४ प्रकृतीच्या कारणामुळे रांगेत तासंतास उभे राहणे शक्य नसल्याने काहींनी खाजगी रुग्णालयात लस घ्यायला पसंती दिली.

Web Title: So far, 6,260 people have been vaccinated at private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.