शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

‘स्मिता’ देणार रेल्वे प्रशासनास धोक्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 10:37 IST

चित्तवेधक रोबोट : रेल्वे रूळास तडा गेल्याची माहिती प्रशासनास कळणार

- सुनील साळुंखेशिरपूर (धुळे) -  शिरपूर शहरातील आर. सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कल्पेश पाटील याने रेल्वे रूळास तडा गेल्यास त्यापूर्वी रेल्वे प्रशासनास पूर्वसूचना देणारा ‘स्मिता’ नावाचा रोबोट तयार केला आहे. शिरपूर येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रोनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन विभागातून पदवीचे शिक्षण घेत असलेल्या कल्पेश पाटील या विद्यार्थ्याच्या संशोधनाच्या कौशल्याची दखल घेत त्याला गांधीयन यंग टेक्नोलॉजीकल इनोव्हेशन पुरस्कार जाहिर झाला आहे. कल्पेश पाटील याच्या सेफ्टी मॉंनिटरिंगइन ट्रेन अप्लिकेशन (स्मिता) या संशोधनाला नामांकन प्राप्त झाले आहे.

सोसायटी फॉर रिसर्च एन्ड इनिशियेटीव्ह फॉर सस्टेनेबल टेक्नोलॉजीस अ‍ॅण्ड इन्स्टिट्यूशन द्वारे दरवर्षी अभियांत्रिकी, विज्ञान, कृषी, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे होणाऱ्या संशोधन व उद्योजक उत्सव दरम्यान पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी कल्पेशला नामांकन मिळाले आहे. या अप्लिकेशन मधील संशोधनाने के.पी.आय.टी.स्पार्कल पुणे व भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे आयोजित हेंकेथोंन २०१८ साठी विशेष सहभाग नोंदवला होता. त्यास या यशासाठी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम व जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या कल्पना कणाकरी ब्रम्हांडाचा भेद करी या बोधवाक्यातून प्रेरणा मिळाली आहे. त्यास प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील, उपप्राचार्या डॉ.पी.जे.देवरे, प्रा.स्मितल पाटील रोहित, आसापुरे, धनश्री महाजन, कामना भदाणे, जयेश बारी, दिव्यांनी राजपूत यांचे सहकार्य मिळाले.

रेल्वे रूळाला तडा व रूळा खालची खडी खचल्याने दरवर्षी अनेक अपघात होतात. यामध्ये अनेक लोक जखमी तर अनेक मृत्युमुखी पडतात. या घटनेमुळे जीवितहानी व वित्तहानी होणेस प्रतिबंधबसावा म्हणून ‘स्मिता’ या रोबोटची निर्मिती केली. या रोबोट तयार करण्यासाठी इन्फोरेड व अल्ट्रासोनिक सेन्सर, कॅमेरे तसेच जी.पी.एस.तंत्रज्ञानाचा वापर केला असून याचे मापक रेल्वे कंट्रोल रूमला रोबोटमध्ये स्थित आधुनिक उपकरणाच्या माध्यमाने माहिती कळविली जाणार आहे. यात ‘स्मिता’ची सर्व कार्यप्रणाली ही सौर उर्जेवर चालणार आहे.कल्पेशच्या कल्पक बुद्धीतून सुचलेल्या कल्पनांना अनेक शुभेच्छासह त्याच्या हातून देशाच्या विकासात भर घालणा-या भारतीय रेल्वेत नवीन शोध होऊन रेल्वेच्या विकासात कल्पेशचा हातभार लाभो...अश्या प्रकारच्या शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील, डॉ.पी.जे.देवरे यांनी दिल्यात़कल्पेश भागवत पाटील हा मूळचा जळगावचा असून त्याचे वडील भागवत बारकू पाटील हे एका कंपनीत कामाला आहे तर आई गृहिणी आहे.

टॅग्स :localलोकलIndian Railwayभारतीय रेल्वे