औद्योगिक वसाहसीतीसाठी जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:32 AM2021-04-14T04:32:55+5:302021-04-14T04:32:55+5:30

यावेळी पिंपळनेर, नवेनगर रस्त्यावर जेबापूर शिवार व लगतची शेतजमीन व जामखेली प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर पिंपळनेर बल्हाणे रस्त्यावरील सूतगिरणीजवळील ...

Site inspection for industrial settlement | औद्योगिक वसाहसीतीसाठी जागेची पाहणी

औद्योगिक वसाहसीतीसाठी जागेची पाहणी

Next

यावेळी पिंपळनेर, नवेनगर रस्त्यावर जेबापूर शिवार व लगतची शेतजमीन व जामखेली प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर पिंपळनेर बल्हाणे रस्त्यावरील सूतगिरणीजवळील तीनशे ते चारशे एकर जमिनीची पाहणी केली व पांझरा प्रकल्पाचीही पाहणी केली. यावेळी या अधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीसाठी जागा योग्य असल्याचे संकेत दिले.

पिंपळनेर व्यापारी संघटना व ग्रामस्थांनी २००१ पासून आज २०२१ पर्यंत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार हिना गावित, आमदार मंजुळा गावित, आमदार विजयकुमार गावित, माजी मंत्री माणिकराव गावित, माजी आमदार डी.एस. अहिरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. २००५ मध्येही या जागेचा सर्व्हे झाला होता. मात्र, या कामाला गती मिळाली नाही.

यावेळी सदर सदस्यांनी नवेनगर व देशशीरवाडे शिवारातील जागा पसंतीस पडली असून, आता याठिकाणी पाठपुरावा करण्याची गरज असणार आहे. या जागेवर भविष्यात उद्योग निर्माण करण्यासाठी आता एकजुटीने काम करणे गरजेचे असणार आहे. तरी स्थानिक व्यापारी उद्योजक यांनी एकत्र येण्याची गरज आहे.

Web Title: Site inspection for industrial settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.