शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
5
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
6
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
7
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
8
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
9
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
10
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
11
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
12
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
13
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
14
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
15
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
16
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
17
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
18
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
19
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
20
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:01 IST

प्रशासन : अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला नाशिकला गेले, कामकाज सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी हे देखील मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीसाठी गुरूवारी नाशिकला गेल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट होता़ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयाची भिस्त होती़ कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते; परंतु स्वागत आणि अभ्यागत कक्षात शांतता होती़राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुरूवारी नाशिक विभागाची आढावा बैठक नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती़ त्यामुळे जिल्हाधिकारी गंगाथरण डी, निवासी उप जिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी दाणे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. बैठकीसाठी नाशिकला गेले होते़प्रमुख अधिकारी नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर शुकशुकाट होता़ अभ्यागतांची गजबज असलेला अभ्यागत कक्ष तसेच स्वागत कक्ष देखील रिकामा होता़ इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचे दैनंदिन कामकाज सुरू मात्र सुरळीत सुरू होते़भारत बंद दरम्यान बुधवारी धुळ्यात झालेल्या हिंसाचाराच्या मुद्यावर भाजप आणि काँग्रेस पक्षाने मोर्चे काढून निवेदन दिले़ दोन्ही पक्षांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी स्वीकारले निवेदन देणाºया शिष्टमंडळाव्यतिरिक्त अन्य अभ्यागतांची वर्दळ नेहमीप्रमाणे दिसली नाही़ मुख्यमंत्री ठाकरे हे कायदा आणि सुव्यवस्था या बाबतीत देखील आढावा घेणार असल्याने पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना देखील बैठकीसाठी नाशिकला बोलविण्यात आले होते. मात्र शहरातील परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक धुळ्यातच थांबल्याची माहिती सुत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध सात विषयांचा आढावा घेण्यात आला़ त्यात जिल्हा परिषद रस्त्यांची सद्यस्थिती आणि दुरूस्ती, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांची सद्यस्थिती आणि दुरूस्ती, अपूर्ण जलसिंचन प्रकल्पांचा आढावा, प्रकल्पग्रस्तांच्या पूनर्वसनाबद्दलची माहिती, महावितरणच्या कामांचा प्रगती अहवाल आणि आढावा, कृषी पंपांसाठी शेतकºयांना दिल्या जाणाºया वीज जोडणीच्या कामांचा आढावा, उच्चदाब वितरण प्रणालीची सद्यस्थिती, दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण, मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम, आरोग्य सुविधा आणि आरोग्याच्या बाबतीत आदी विषयांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली़

टॅग्स :Dhuleधुळे