वीकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:35 AM2021-04-11T04:35:16+5:302021-04-11T04:35:16+5:30

प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ही चिंताजनक बाब आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून विविध प्रकारचे ...

Shukshukat on the first day of the weekend lockdown | वीकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शुकशुकाट

वीकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शुकशुकाट

Next

प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ही चिंताजनक बाब आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून विविध प्रकारचे निर्बंध लावले जात आहेत. त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवरून करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. त्यात पुन्हा शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. ठरविलेल्या आदेशानुसार शनिवार पहिलाच दिवस होता. पहिल्याच दिवशी व्यापारी आणि सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवणे पसंत केले. प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले. शहरात या आदेशाची काटेकाेरपणे अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले.

रस्त्यावर शुकशुकाट

मेडिकल स्टोअर्स, कृषी संबंधित दुकाने वगळता सर्वच व्यवसाय बंद असल्याने मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर, पाचकंदील परिसरात शुकशुकाट दिसून आला. मुख्य रस्त्यावर अगदी तुरळक वाहतूक सुरू होती. सर्वत्र बंद असल्याने बारा पत्थर, महात्मा गांधी पुतळा, अग्रसेन चौक, साक्री रोड, दत्त मंदिर परिसर, वाडीभोकर रोड, पारोळा रोड यासह अन्य महत्त्वाच्या चौकांत शांतता पसरली होती.

पोलीस अधीक्षक रस्त्यावर

वीकेंड लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य महामार्गासह प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, शिवाय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी शहरातील पारोळा रोड, कराचीवाला खुंट, महात्मा गांधी पुतळा परिसरात जाऊन पाहणी केली. विनाकारण फिरणाऱ्यांना त्यांनी जाब विचारला. त्याचवेळेस पोलिसांना पाहून काहींनी आपला मार्ग बदलून घेणे पसंत केले. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे होते. याशिवाय विविध पोलीस ठाण्याच्या अंतर्गत प्रभारी अधिकाऱ्यांनी फिरून बंदोबस्त तैनात ठेवला होता. विनाकारण फिरणाऱ्यांना अडविले. एकूणच शहरात वीकेंड लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला.

व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद

वीकेंड लॉकडाऊन असल्याने व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद ठेवणे पसंत केल्याने शहरात सर्वच ठिकाणी दुकाने बंद होती. केवळ अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल दुकाने सुरू होती.

(कोटसाठी)

कोरोनाची साथ अतिशय घातक असल्याने त्याचा सामना हा संयम आणि नियमांचे पालन करूनच केला जाऊ शकतो. नागरिकांनी मास्क वापरावा, हात वारंवार साबणाने धुवावेत. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. शासन नियमांचे पालन करावे.

- चिन्मय पंडित

पोलीस अधीक्षक, धुळे

Web Title: Shukshukat on the first day of the weekend lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.