साक्रीत प्रशिक्षणार्थी वीज कर्मचाºयाचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 17:34 IST2018-07-27T17:33:23+5:302018-07-27T17:34:29+5:30
सुरपान शिवार : ‘तो’ तरुण पाचोरा तालुक्यातील, घटनेमुळे हळहळ

साक्रीत प्रशिक्षणार्थी वीज कर्मचाºयाचा शॉक लागून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : प्रशिक्षणार्थी वीज कर्मचाºयाचा शॉक लागून विजेच्या खांबावरच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना साक्री तालुक्यातील सुरपान शिवारात शुक्रवारी दुपारी घडली़ मयत तरुण हा पाचोरा तालुक्यातील रहिवाशी आहे़
पाचोरा तालुक्यातील सुरेश बंजारा हा २३ वर्षीय युवक साक्री वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून कार्यरत होता़ उच्चदाब वाहिनी वरील दुरुस्तीचे काम करताना वीज प्रवाह अचानक सुरु झाला़ त्यात त्याला जबर शॉक लागला़ परिणामी त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे़
या घटनेमुळे विज वितरण कंपनीतील कर्मचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे़ या प्रशिक्षणार्थी वीज कर्मचाºयाच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित होऊ लागला आहे़