शॉर्टसर्किटमुळे घराला आग, साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:47 IST2019-12-14T11:46:58+5:302019-12-14T11:47:20+5:30

जुने धुळे परिसर : सुदैवाने जीवितहानी टळली

Shorts circuit fire to house, material ashore | शॉर्टसर्किटमुळे घराला आग, साहित्य खाक

शॉर्टसर्किटमुळे घराला आग, साहित्य खाक

धुळे : शहरातील जुने धुळे भागात असलेल्या गल्ली नंबर १४ मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली़ ही घटना गुरुवारी घडली़ या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले़ सुदेवाने जीवितहानी टळली आहे़ अग्नी उपद्रवची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे़
शहरातील जुने धुळे भागात असलेल्या शनिमंदिराजवळ नामदेव बाबुलाल चौधरी यांचे वास्तव्य आहे़ गुरुवारी दुपारी अचानक विद्युत प्रवाह वाढला़ परिणामी चौधरी यांच्या घराला फटका सहन करावा लागला़ त्यांच्या घरात शॉर्टसर्किट झाले़ शॉर्टसर्किट होताच घरात उडालेल्या ठिणग्यांमुळे घरात असलेल्या संसारोपयोगी साहित्याला आग लागली़ पाहता पाहता संपुर्ण संसारच या आगीत जळून भस्मसात झाला़
याप्रकरणी नामदेव चौधरी यांनी घटनेची माहिती आझादनगर पोलिसांना कळविली़ आगीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ अग्नीउपद्रवची नोंद पोलिसांच्या दप्तरी करण्यात आली आहे़ पोलीस कर्मचारी वाघ घटनेचा पुढील तपास करीत आहेत़

Web Title: Shorts circuit fire to house, material ashore

टॅग्स :Dhuleधुळे