शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अल्प मुदतीच्या पिकांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:56 IST

कापडणे : पाणीटंचाईमुळे शेपा व पालक भाजीवर्गीय पिक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल

कापडणे : कापडणेसह परिसरात सलग तीन ते चार वर्षांपासून पावसाळा कमी होत असल्याने विहिरी व कुपनलिकांची पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. पाणीटंचाईमुळे अल्पमुदतीचे शेपू व पालक भाजीवर्गीय पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.विहिरींची जलपातळी दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत असल्याने खूपच कमी क्षेत्रफळात बागायत शेती दिसून येत आहे. बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात पाण्याची सोय आहे. मात्र, हे पाणीही मे व जूनपर्यंत पूर्णत: टिकणार नसल्याने शेतकºयांनी विहिरी व कुपनलिकांच्या पाण्याचा अंदाज घेऊन कमी दिवसात येणाºया पालेभाज्यावर्गीय पिके घेण्यावर भर दिला आहे. सध्या पालक भाजी बाजारात विक्रीसाठी येत आहे.दिर्घकालीन पिकांकडे पाठपाणीटंचाई असल्यामुळे उन्हाळी मका, भुईमूग, ज्वारी, बाजरी, दादर, अशा दीर्घकालीन पिकांकडे शेतकºयांनी पाठ फिरविली आहे. ज्या शेतकºयांकडे थोड्याफार प्रमाणात पाण्याची सोय आहे, असे शेतकरी सध्या अल्पमुदतीच्या पिकाची लागवड करीत आहेत.शेपा व पालक हे प्रामुख्याने थंड वातावरणात किंवा थंडीच्या दिवसात घेण्याचे पीक असते. या दिवसात पिकाची जोमदार वाढ होत असते. मात्र, ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय असते असे शेतकरी पालक पीक वर्षभरही घेऊ शकतात. पालक लागवड केल्यानंतर पाच आठवड्यानंतर पालक काढणीस सुरुवात होते. कापडणे येथील काही शेतकरी सध्या शेपू, पालकची कापणी करून बाजारात विक्रीसाठी नेत आहेत. एकदा तयार झालेल्या पालक भाजीची कापणी झाल्यावर पुन्हा या पिकाला पाणी भरले तर आठ ते दहा दिवसानंतर परत पालक भाजी काढण्यासाठी तयार होत असते. असे पाच ते सहा वेळेस पुन्हा पुन्हा पालक भाजी काढणी करता येते. मात्र, सध्या पाणीटंचाई असल्याने येथील शेतकरी जेमतेम एक ते दोन वेळेस पालक पिकाचे उत्पादन घेत आहेत.वर्षभर ग्राहकांकडून मागणीआरोग्याच्या दृष्टिकोनातून पालक भाजीला वर्षभर ग्राहकांकडून पसंती असते. मात्र, या भाजीचे दर मागणी व पुरवठ्यानुसार कमी अधिक होत असतात. सध्या उन्हाळा असला तरी शेतकºयांनी उत्पादित केलेली पालक भाजी २० ते २५ रुपये किलोच्या दराने विक्री होत आहे. मात्र, पाणीटंचाई असल्याने पिकांची वाढ खुंटून पालक उत्पादनात घट येत आहे. परिणामी शेतकºयांना याचा आर्थिक फटका बसत आहे. जाणकार शेतकºयांनी सांगितले की, पालकचे पीक वर्षभर घेता येऊ शकते. बहुतांश पाण्याचा निचरा होणाºया शेतजमिनीत शेणखताची मात्रा योग्य असल्यास व पाणी मुबलक असल्यास पालक शेतीपासून दोन पैसे शेतकºयांच्या हाती येतात. पाणीटंचाईची समस्या असल्यामुळे ज्या शेतकºयांकडे जेमतेम पाण्याची सोय आहे, असे शेतकरी कमी पाण्यावर ठिबक सिंचनाच्या सहाय्याने सध्या भेंडी, ढेमसे, हिरवी काकडी, कारले, गिलके, वांगी, गवार अशी कमी दिवसात येणारी पालेभाज्यावर्गीय पिके घेताना दिसून येत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे